महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जहाजावर ड्रोन हल्ला प्रकरण; भारतीय नौदलानं अरबी समुद्रात केल्या युद्धनौका तैनात - भारतीय नौदलानं तीन युद्धनौका तैनात केल्या

Deploys Warships In Arabian Sea : इस्रायलच्या जहाजावर ड्रोननं हल्ला केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी भारतीय नौदलानं मोठी खबरदारी घेतली आहे. भारतीय नौदलानं तीन युद्धनौका अरबी समुद्रात तैनात केल्या आहेत.

Deploys Warships In Arabian Sea
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 3:07 PM IST

नवी दिल्ली Deploys Warships In Arabian Sea: एमव्ही केम या तेलवाहू जहाजावर पश्चिम किनाऱ्यावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळं भारतीय नौदलानं सावध पवित्रा घेतला आहे. फॉरेन्सिक तपासणीनंतर या हल्ल्याबाबतची माहिती कळू शकेल, असं भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं. सोमवारी एमव्ही केम हे जहाज मुंबईच्या बंदरात आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान हा ड्रोन हल्ला झाल्यानंतर आता नौदलानं अरबी समुद्रात 3 युद्धनौका तैनात केल्याची माहिती भारतीय नौदलाच्या वतीनं देण्यात आली आहे.

तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला :कच्च तेल घेऊन एमव्ही केम हे जहाज अरबी समुद्रातून मंगलोरला जात होतं. यावेळी अचानक जहाजाला ड्रोननं धडक दिली. यावेळी जहाजाचं नुकसान झालं आहे. त्यामुळं हे जहाज मुंबईतील बंदरात आणण्यात आलं. या तेलवाहू जहाजावर इराणच्या ड्रोननं हल्ला केल्याची माहिती पेंटॉगॉनच्या प्रवक्त्यानं दिली. तेलवाहू जहाजाला ड्रोननं धडक दिल्यानंतर नौदलानं पी 8I हे लांब पल्ल्याचं गस्ती विमान तैनात केलं आहे.

अरबी समुद्रात तीन युद्धनौका तैनात :तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर नौदलानं मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय नौदलानं खबरदारी म्हणून अरबी समुद्रात तीन युद्धनौका तैनात केल्या आहेत. यात आयएनएस मुरमुगाव, आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या तीन युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. एमव्ही केम या तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्यानंतर आणखी भारतीय जहाजांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. त्यामुळं भारतीय नौदलानं अरबी समुद्रात तीन युद्धनौका तैनात केल्या आहेत.

मुंबईत आणलं तेलवाहू जाहाज :एमव्ही केम या जहाजावर ड्रोन हल्ला केल्यानंतर भारतीय नौदलानं हे जहाज मुंबईतील बंदरात आणण्यात आलं आहे. या जहाजावर 21 भारतीय आणि एक एक व्हिएतनामी क्रू होता. यावेळी भारतीय तटरक्षक दलानं स्फोट झालेल्या भागाची तपासणी केली. जहाजावर सापडलेल्या ड्रोन हल्ल्यातील अवशेषावरुन त्याचं विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय नौदलाच्या वतीनं देण्यात आली. यावेळी खराब झालेल्या भागाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

हेही वाचा :

  1. Titanic Remembrance Day 2023 : काय होता टायटॅनिक अपघाताचा इतिहास, किती प्रवाशांनी गमावला जीव, जाणून घ्या सविस्तर
  2. OceanGate Titan submersible : समुद्रात बुडालेल्या टायटन सबमर्सिबलच्या मलब्यात सापडले मानवी अवशेष,अपघाताचे गुढ कळणार
  3. अरबी समुद्रात इस्रायलच्या जहाजावर ड्रोन हल्ला; जहाजावरील २० भारतीयांसह सर्व कर्मचारी सुखरूप, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details