महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सैन्यदलाकडून ड्रोन हल्ल्याविरोधात क्षमता विकसित करण्याचे काम सुरू - सी. एम. नरवणे - जम्मूमधील फोर्स स्टेशनवर हल्ला

दहशतवाद्यांनी रविवारी जम्मूमधील फोर्स स्टेशनवर हल्ला केला होता. त्याबाबत बोलताना सैन्यदल प्रमुख नरवणे म्हणाले, की भारत व पाकिस्तानमध्ये फेब्रुवारीमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली आहे. तेव्हापासून सीमेवर घुसखोरी झालेली नाही.

Army chief
सैन्यदल प्रमुख

By

Published : Jul 1, 2021, 4:12 PM IST

नवी दिल्ली - सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रोनने देशातील सुरक्षेच्या आव्हानांमध्ये गुंतागुंत वाढली आहे भारतीय सैन्यदलाकडून ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी यंत्रणा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली. ते थिंक टँकमध्ये बोलत होते.

सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले, की सुरक्षा आस्थापनांना आव्हानांची माहिती आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. एखाद्या देशाने किंवा देशाने पुरस्कृत करून तयार केलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी यंत्रणा आम्ही विकसित करत आहोत. कायनेटिक आणि नॉन कायनेटिक या दोन्ही प्रकारच्या ड्रोनचा सामना करण्यासाठी ही यंत्रणा विकसित होणार आहे.

हेही वाचा-Doctors Day 2021 : आज डॉक्टर्स डे, जाणून घ्या का साजरा करतात...

फेब्रुवारीपासून भारत-पाक सीमेवर घुसखोरी नाही-

दहशतवाद्यांनी रविवारी जम्मूमधील फोर्स स्टेशनवर हल्ला केला. त्याबाबत बोलताना सैन्यदल प्रमुख नरवणे म्हणाले, की भारत व पाकिस्तानमध्ये फेब्रुवारीमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली आहे. तेव्हापासून सीमेवर घुसखोरी झालेली नाही. घुसघोरी थांबल्याने काश्मीरमधील दहशतवाद्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांशी संबंधित घटनाही कमी झाल्या आहेत.

हेही वाचा-कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत करण्याचे केंद्राला 'सर्वोच्च' निर्देश

शांतता आणि विकास उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या धडा शिकवू

शांतता आणि विकास उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करणारा नेहमीच एक घटक असणार आहे. आम्हाला त्याची सेवा करावी (धडा शिकविणे) लागणार आहे, असा त्यांनी गर्भित इशारा दिला आहे. त्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. आपल्याकडे दहशतवाद विरोधी आणि घुसखोरी विरोधात जम्मू आणि काश्मीरमध्ये बळकट यंत्रणा आहे. आमच्या मोहिमेमुळे शांततेबाबतची खात्री यापुढेही कायम राहणार आहे, असा सैन्यदलप्रमुखांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा-सहमतीने संबंध ठेवल्याच्या फेसबुकवरील पुराव्याने बलात्काराच्या आरोपीला जामिन

ड्रोनच्या हल्ल्यानंतर सैन्यदलाकडून खबरदारी

रविवारी जम्मूत हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पुन्हा जम्मूच्या कालूचक आणि कुंजवानी भागात सैनिकी तळाजवळ दोन ड्रोन घोंघावताना दिसले. भारतीय सैन्याकडून फायरिंग करण्यात आल्यानंतर हे ड्रोन दिसेनासे झाले. सध्या भारतीय सैन्याकडून बेपत्ता ड्रोनची माहिती घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांकडून हेरगिरी आणि हल्ल्यांसाठी ड्रोनचा वापर केला जात आहेत. कारण, थेट हल्ल्यापेक्षा ड्रोन हल्ले करण्यात हल्लेखोरांना कमी जोखीम उचलावी लागते.

ABOUT THE AUTHOR

...view details