महाराष्ट्र

maharashtra

प्रेमाला नसते 'सीमा', लग्नासाठी भारतात येण्यास पाकिस्तानी महिलेला परवानगी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 9:02 PM IST

Visa To Pakistani Bride : पाकिस्तानातील एक मुलगी लग्नासाठी भारतात येणार आहे. तिला भारत सरकारनं ४५ दिवसांचा व्हिसा मंजूर केला आहे.

Visa To Pakistani Bride
Visa To Pakistani Bride

अमृतसर Visa To Pakistani Bride : प्रेमाला सीमा नसतात हे आपण सर्वच जाणतो. काही महिन्यांपूर्वी सीमा हैदर नावाची एक पाकिस्तानी महिला तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी अवैधरित्या भारतात दाखल झाली होती. आता सीमापार प्रेमाचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मात्र हे प्रकरण काहीस वेगळं आहे. इथे प्रेयसीला आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी अवैध मार्गाचा वापर करावा लागला नाही. तिला भारत सरकारनं रितसर व्हिसा देऊन लग्नासाठी परवानगी दिली आहे!

भारत सरकारनं लग्नासाठी व्हिसा दिला : जवेरिया खानम नावाची २१ वर्षीय मुलगी पाकिस्तानातून लग्नासाठी भारतात येणार आहे. तिला भारत सरकारनं ४५ दिवसांचा व्हिसा दिला. ती वाघा बॉर्डरवरून भारतात दाखल होईल. जावरिया खानमचा होणारा पती समीर खान कोलकाताहून वाघा बॉर्डरला तिला घ्यायला जाईल. हे दोघं येत्या काही दिवसात लग्न करणार आहेत. यानंतर ती दीर्घकालीन व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज करेल.

जवेरिया खानम आणि समीर खान

दोनदा व्हिसा नाकारला होता : समीर खाननं सांगितलं की, भारत सरकारनं त्याच्या होणाऱ्या पत्नीला दोनदा व्हिसा नाकारला होता. त्यानंतर त्यानं सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मकबूल अहमद वासी कादियान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी यापूर्वी अनेक पाकिस्तानी वधूंना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. मकबूल अहमद यांनी समीर खान यांना या प्रकरणात मदत केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर भारत सरकारनं जवेरिया खानम हिला व्हिसा मंजूर केला. दोन्ही कुटुंबांना एकत्र येण्यास मदत केल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचं आभार मानलं आहे.

या आधी ऑनलाइन लग्नाचं प्रकरण : भारत सरकारनं पाकिस्तानी वधूंना लग्नासाठी व्हिसा नाकारण्याचे प्रकरणं या आधीही समोर आले आहेत. जोधपूर शहरात राहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट अरबाज खान याचं लग्न पाकिस्तानातील कराची येथील अमिनासोबत ठरलं होतं. मात्र लग्नाआधी व्हिसा न मिळाल्यानं या दोघांनी ऑनलाइन लग्न केलं. त्यांच्या ऑनलाइन लग्नासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या लग्नाला शहरातील काझीही उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Seema Haider : सीमा हैदर होणार 'रॉ एजंट', चित्रपटातील भूमिकेसाठी दिली ऑडिशन
  2. Seema Haider : 'अदनान सामीला नागरिकत्व दिले, सीमा हैदरला का नाही?', सीमाच्या वकिलांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details