नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय दुतावासावर खालिस्तानी कट्टरपंथीयांनी हल्ला केला होता. या हल्ल्यांविरुद्ध जलद कारवाई करत भारतीय अधिकाऱ्यांनी बुधवारी ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरील सर्व बाह्य सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयासमोरील सुरक्षा बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खालिस्तानी कट्टरपंथीयांनी तोडफोड केल्यानंतर भारताकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भारतानेही ब्रिटेनला खडेबोल सुनावले आहेत.
भारताकडून निषेध व्यक्त -भारताने दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तालयाची सुरक्षा काढली आहे. त्यानंतर ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सुरक्षेच्या बाबींवर भाष्य करत नाही. ज्या देशाशी मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत त्या देशाविरुद्ध भारताने उचललेले हे पहिलेच कठोर पाऊल आहे. फुटीरतावादी अमृतपाल सिंग याच्यावरील पोलीस कारवाईचा निषेध करणाऱ्या खालिस्तान समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय ध्वज खाली आणल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ब्रिटन दूतावासाची सुरक्षा हटवली
ब्रिटेनला खडेबोल - लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाविरुद्ध खालीस्तानी आणि काही विरोधी घटकांनी केलेल्या कारवाईबद्दल भारताने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 19 मार्चच्या संध्याकाळी उशिरा ब्रिटेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाबाबतची सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सोमवारी एका विशेष ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, आम्ही ब्रिटेनच्या उप उच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच भारताचा यावर रोषही व्यक्त केला आहे.
ब्रिटन दूतावासाची सुरक्षा हटवली
दोषींवर कडक कारवाईची मागणी -क्वात्रा म्हणाले की, दोषींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. ब्रिटेन उच्चायुक्तालयात सुरक्षा तैनात करण्याची गरज आम्ही ब्रिटीश अधिकाऱ्यांना सूचित केली आहे. 20 मार्च रोजी नवी दिल्ली येथे यूएस प्रभारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, भारताने सॅन फ्रान्सिस्को येथील त्यांच्या वाणिज्य दूतावासाच्या मालमत्तेची तोडफोड केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा -Indian Embassy San Francisco : लंडननंतर सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावर खलिस्तान्यांचा हल्ला, अमेरिकेकडून निषेध व्यक्त