महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Narayan Murthy : मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यावस्था ठप्प - नारायण मूर्ती - Manmohan Singh government

इन्फोसिसचे ( Infosys ) सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती ( NR Narayan Murthy ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ( Indian Institute of Management ) अहमदाबादमध्ये काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात ( Congress Govt ) भारतातील आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. मनमोहन सिंग ( Prime Minister Manmohan Singh  ) सरकारमध्ये वेळेवर निर्णय घेतले जात नसल्याचेही ते म्हणाले.

Narayan Murthy
नारायण मूर्ती

By

Published : Sep 24, 2022, 10:30 AM IST

अहमदाबाद -भारतातील आयटी दिग्गज इन्फोसिसचे ( Infosys ) सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती ( NR Narayan Murthy ) शुक्रवारी म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात ( Congress Govt ) भारतातील आर्थिक ( Indian economy ) घडामोडी ठप्प झाल्या होत्या. मनमोहन सिंग ( Prime Minister Manmohan Singh ) सरकारमध्ये वेळेवर निर्णय घेतले जात नसल्याचेही ते म्हणाले.

भारतीय तरुण चीनचा योग्य प्रतिस्पर्धी होवू शकतो -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ( Indian Institute of Management ) अहमदाबाद येथे तरुण उद्योजक, विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादादरम्यान, नारायण मूर्ती यांनी हे वक्तव्य केले. भारतीय तरुण चीनचा योग्य प्रतिस्पर्धी बनवू शकतो. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, मी लंडनमध्ये (2008 ते 2012 दरम्यान) एचएसबीसीच्या बोर्डावर होतो. सुरुवातीच्या काही वर्षांत जेव्हा बोर्डरूममध्ये चीनचा उल्लेख दोन-तीन वेळा झाला तेव्हा भारताचे नाव फक्त एकदाच आले. मूर्ती पुढे म्हणाले की, पण दुर्दैवाने नंतर भारतात काय झाले हे मला माहीत नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ( Prime Minister Manmohan Singh ) हे एक असामान्य व्यक्ती होते. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पण, त्यांच्या भारतीय अर्थव्यास्था ठप्प झाली होती. सरकार कोणतेही निर्णय वेळेवर घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपच्या काळात देशाला आंतराष्ट्रीय स्थान - जेव्हा 2012 मध्ये मी HSBC सोडले, तेव्हा भारताचा उल्लेख मीटिंगमध्ये क्वचितच केला गेला, तर चीनचे नाव सुमारे 30 वेळा घेतले गेले. इन्फोसिसचे माजी अध्यक्ष मूर्ती म्हणाले की, आज जगभरात भारताबद्दल आदराची भावना आहे. देश आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. मनमोहन सिंग यांच्या अर्थमंत्री असताना 1991 मध्ये लागू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा मेक इन इंडिया,( Make in India ) स्टार्टअप इंडिया ( Startup India ) यांसारख्या सध्याच्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजनांमुळे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविण्यात मदत झाली आहे.

चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा 6 पट मोठी -ते पुढे म्हणाले की, जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो. तेव्हा फारशी जबाबदारी नव्हती, कारण माझ्याकडून किंवा भारताकडून फारशा अपेक्षाही नव्हत्या. आशा आहे की आज तुम्ही देशाला पुढे घेऊन जाल. मला वाटते की तुम्ही भारताला चीनचा सामना करण्यासाठी योग्य प्रतिस्पर्धी बनवू शकता. चीनने अवघ्या 44 वर्षांत भारताला मागे टाकले आहे. चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा 6 पट मोठी आहे. 1978 ते 2022 या 44 वर्षांत चीनने भारताला खूप मागे टाकले आहे. सहापट मोठे होणे हा काही विनोद नाही. तुम्ही लोक मेहनत कराल तर आज चीनला जसा मान मिळतो तसाच सन्मान भारतालाही मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details