नवी दिल्ली: जर पुढील 25 वर्षांमध्ये देशाची सरासरी वार्षिक वाढ ७ ते ७.५ टक्के राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 2047 पर्यंत 20000 अब्ज डॉलर म्हणजेच 20 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल Bibek Debroy On Indian economy , असा अंदाज पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय EAC PM Chairman Bibek Debroy यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, भारताने प्रतिस्पर्धात्मकता 100 चा मसुदा जरी जारी केला असला तरी पुढील 25 वर्षांत देशाचा सरासरी आर्थिक विकास दर ७ ते ७.५ टक्के राहिल्यास देशाचे वार्षिक दरडोई उत्पन्न हे 10,000 अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त असेल. ते म्हणाले की, 2047 पर्यंत भारताचाही उच्च मानव विकास श्रेणीतील देशांमध्ये समावेश होईल.