नई दिल्ली :दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका जोडप्याला अटक करण्यात आली ( Delhi Airport Indian Couple Arrested ) आहे. त्याच्यावर शस्त्रास्त्र तस्करीचा आरोप आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. या दाम्पत्याकडून 45 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली शस्त्रे खरी आहेत की नाही याची ‘बॅलिस्टिक रिपोर्ट’ पुष्टी करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली विमानतळावर 45 पिस्तूल जप्त - अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, 'प्राथमिक अहवालात नॅशनल सिक्युरिटी गार्डने (एनएसजी) शस्त्रे पूर्णपणे कार्यरत असल्याची पुष्टी केली आहे.' व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरातून सोमवारी येथे आलेल्या आरोपींवर अधिकारी नजर ठेवून होते. या जोडप्यासोबत त्यांची नवजात मुलगीही होती. "पुरुष प्रवाशाच्या सामानाच्या तपासणीदरम्यान, 45 पिस्तूल सापडले, ज्याची किंमत अंदाजे 22.5 लाख रुपये आहे," सीमाशुल्क विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.