पठाणकोट: भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर पंजाबच्या पठाणकोटमध्ये कोसळल्याची घटना मंगळवारी समोर आली. हे हेलिकॉप्टर जिल्ह्यातील रणजित सागर धरणाजवळ कोसळले. सध्या घटनास्थळावर बचावकार्य राबविले जात आहे.
पोलिसांनी दिली माहिती
तलावात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि आम्हि तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याचे पठाणकोटचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले. सध्या इथे बचावकार्य राबविले जात आहे. अजून कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नसल्याचेही ते म्हणाले. रणजित सागर धरण हे पठाणकोटपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे.