महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Animal lover Rishabh Kaushik : रशियाच्या आक्रमणानंतरही भारतीय विद्यार्थ्याने युक्रेन सोडण्यास दिला नकार, कारण जाणून होताल आश्चर्यचकित - ऋषभ कौशिक डेहराडून

पाळीव प्राणी आपले सर्वात चांगले मित्र असतात. पाळीव प्राण्यांची ईमानदारी, प्रेम आणि करुणाच्या गोष्टी तुम्ही खूप वाचल्या असतली. मात्र, आज तुम्हाला आम्ही एका व्यक्तीने पाळीव प्राण्याबद्दल दाखविलेले प्रेम, काळजी आणि करुणा सांगणार ( Indian animal lover Rishabh Kaushik ) आहोत.

प्राणी प्रेमी ऋषभ कौशिक
प्राणी प्रेमी ऋषभ कौशिक

By

Published : Feb 25, 2022, 10:55 PM IST

डेहराडून- रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे ( Russia Ukraine war ) अनेक नागरिक हे युक्रेनमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, एक भारतीय विद्यार्थी मायदेशात येण्यास नकार देत आहे. कारण, त्याने पाळलेल्या श्वानाला भारतात आणण्याची रीतसर परवानगी मिळालेली नाही. चला, या प्राणीप्रेमी ऋषभ कौशिकची ( Indian animal lover Rishabh Kaushik ) स्टोरी जाणून घेऊ.

अनेक देशांमधील लोक हे युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतामधील सुमारे 20 हजार भारतीय व विद्यार्थी युक्रेनमध्ये ( Indians stuck in Ukraine ) अडकले आहेत. उत्तराखंडमधील अनेक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. अनेक विद्यार्थी युक्रेनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत ऋषभ कौशिकने पाळलेल्या श्वानाला ( Rishabh Kaushik stuck in Ukraine ) सोडले नाही.

मी जर एकटा आलो तर श्वानाची कोण काळजी घेणार?

हेही वाचा-Russia Ukraine crisis : तुमच्या हातात सत्ता घ्या, व्लादिमीर पुतीन यांचे युक्रेनच्या सैन्यदलाला आवाहन

युक्रेनमधील स्थिती आता बिघडली

डेहराडूनमध्ये राहणारे ऋषभ कौशिक हे तीन वर्षांपासून युक्रेनमध्ये कॉम्पुयटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. ऋषभरचे कुटुंब हे युक्रेनमध्ये व्यवसाय करतात. युक्रेन व रशियामध्ये संघर्षाची स्थिती सुरू झाल्यानंतर ऋषभ यांच्या कुटंबातील 7 सदस्य हे 19 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीला दुबईला निघून गेले. दुसरीकडे ऋषभने दुबईला जाण्यास नकार दिला. कारण, विमानातून त्याच्या पाळीव श्वानाला नेण्यास नकार दिला होता. चिंतातुर झालेल्या ऋषभच्या कुटुंबाने त्याला दुबईला येण्याची विनंती केली. मात्र, त्याने भारत सरकार आणि इतर विभागांशी चर्चा करून श्वानाला घेऊनच घरी येणार असल्याचे सांगितले. मात्र, युक्रेनमधील स्थिती आता बिघडली आहे.

हेही वाचा-Russia Ukraine Crisis : युक्रेनचा रशियापुढे लागणार का टिकाव? जाणून घ्या दोन्ही देशांकडील सैन्यदलाचे सामर्थ्य

श्वानाला आणण्याची अद्याप परवानगी नाही-

डेहराडूनमध्ये ऋषभचे वडील मधुकांत राहतात. त्यांनी ऋषभला भारतामध्ये आणण्यासाठी सर्व तयारी केली होती. मात्र, ऋषभने श्वानासह भारतात येण्याचा आग्रह धरला. ऋषभने सर्व पेपरवर्क पूर्ण केले आहेत. मात्र, त्याला भारत सरकार आणि युक्रेन सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा-Russia Ukraine Crisis : UNSC मध्ये युक्रेनचा प्रश्न ऐरणीवर; रशियावरील ठरावावर आज मतदान

एकटा आलो तर श्वानाची कोण काळजी घेणार?

श्वानामुळे तुम्ही स्वत:चा जीव का धोक्यात घालत आहात? असा प्रश्न ईटीव्ही भारतचे पत्रकार किरण कांत शर्मा यांनी ऋषभशी संवाद साधून केला. तेव्हा ऋषभने जीव धोक्यात घातला नसल्याचे सांगितले. मी सध्या हॉस्टेलमध्ये सुरक्षित आहे. श्वानाला भारतात आणण्यासाठी भारत सरकारचे अधिकारी तयार नाहीत. श्वानाला घेऊन भारतात येण्याची माझी इच्छा आहे. मी जर एकटा आलो तर श्वानाची कोण काळजी घेणार?

श्वानाला कोण खाऊ घालणार?

तुम्ही श्वानाला कोणाकडे देऊ शकात किंवा पाळीव श्वान केंद्रात ठेवू शकता, असा त्यांना पर्याय सुचविला. त्यावर ऋषभ म्हणाले, की मी गेली 4 ते 5 दिवस प्रतिक्षा करत आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. एक वर्षापासून श्वानासोबत आहे. मी गेल्यानंतर हा श्वान कोणाला त्रास सांगेल? लोकांना खाण्यापिण्याची समस्या आहे. त्यासाठी लोकांना रांगेत थांबावे लागत आहे. अशावेळी श्वानाकडे कोण लक्ष देणार ? श्वानाला कोण खाऊ घालणार?

परिस्थिती पूर्ववत होईल, अशी ईश्वराला प्रार्थना

ऋषभ हा युक्रेनची राजधानी किवीवमध्ये आहेत. त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून 5 ते 6 किलोमीटर दूर अंतरावर बॉम्बचा वर्षाव सुरू होता. दोन्ही देश आपआपसात युद्ध करत असल्याचे पाहून वाईट वाटत असल्याचे ऋषभने म्हटले आहे. ही परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास ऋषभने व्यक्त केला. युक्रेनमधील निसर्ग आणि लोकांचे ऋषभ कौतुक करतो. मात्र, सध्या लोक खूप घाबरले आहेत. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये असे चित्र कधीच नव्हते. परिस्थिती पूर्ववत होईल, अशी ईश्वराला प्रार्थना करत असल्याचे ऋषभने म्हटले आहे.

महाराष्ट्राचे 1200 विद्यार्थ्यी युक्रेनमध्ये अडकले!

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे तेथली परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध ( Russia Ukraine Crisis ) सुरू झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच महाराष्ट्रातून शिक्षण घेण्यासाठी गेलेले बाराशे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले ( Students From Maharashtra Stuck In Ukraine ) आहे. यातील 320 विद्यार्थ्यांचा संपर्क झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Vadettiwar ) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वडेट्टीवार यांनी आज सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details