वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रशासनातील भारतीय वंशाच्या नागरिकांच्या वाढत्या सहभागाविषयी गौरवोद्गार काढले. अमेरिकन प्रशासनात भारतवंशीयांचा वाढता सहभाग दिसून येत असून अनेक महत्वाची पदे ते सांभाळत आहेत असे बायडेन म्हणाले.
बायडेन यांच्याकडून गौरवोद्गार
नासाच्या संशोधकांसोबत साधलेल्या व्हर्चुअल संवादादरम्यान बायडेन प्रशासनातील भारतीयांच्या सहभागाबद्दल बोलले. "भारतीय अमेरिकन नागरिकांचे प्रशासनातील वर्चस्व वाढत आहे. तुम्ही(स्वाती मोहन), उपराष्ट्राध्यक्ष(कमला हॅरीस), माझे भाषण लिहिणारे(विनय रेड्डी) हे सर्वच जण भारतीय वंशाचे आहेत." असे बायडेन म्हणाले. नासाच्या मार्स 2020 मोहिमेच्या दिशादर्शन आणि नियंत्रण प्रणालीचे नेतृत्व स्वाती मोहन करीत आहेत.
बायडेन प्रशासनाचा विक्रम