महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Flight Hijacker Killed : एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करणारा दहशतवादी पाकिस्तानमध्ये ठार - shot dead In Karachi

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी (Terrorist of Jaish-e-Mohammed) अनेक वर्षांपासून आयएसआयच्या संरक्षणाखाली कराची पाकिस्तान येथे राहत होता. 1 मार्च रोजी अख्तर कॉलनीतील पॉइंट-ब्लँक रेंजमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्या डोक्यात दोनदा गोळ्या झाडल्या. यातच त्याचा मृत्यू (shot dead In Karachi) झाल्याचे एका अहवालात समोर आले आहे. 1999 मधे एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण (Indian Airlines hijacker) झाले होते त्यात या दहशतवाद्याचा सहभाग आहे.

Airlines hijacker
विमानाचे अपहरण

By

Published : Mar 9, 2022, 4:05 PM IST

Updated : Mar 9, 2022, 4:28 PM IST

नवी दिल्ली: 1999 मध्ये काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या IC-814 इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले होते त्यापैकी एकमिस्त्री जहूर इब्राहिम यास, 1 मार्च रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे समोर आले आहे.

अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, जैश-ए-मोहम्मद दहशतवादी अनेक वर्षांपासून आयएसआयच्या संरक्षणाखाली कराचीमध्ये राहत होता. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीकडे जाणाऱ्या भारतीय एअरलाइन्सचे 24 डिसेंबर 1999 रोजी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर लगेचच अपहरण करण्यात आले होते.

हरकत-उल-मुजाहिदीन या संघटनेवरही अपहरणाचा आरोप असल्याची माहिती आहे. मुश्ताक अहमद जरगर, अहमद उमर सईद शेख आणि मसूद अझहर या तीन अतिरेक्यांची सुटका करणे हा अपहरणाचा हेतू होता. ओलिसांचे संकट सात दिवस चालले आणि सरकारने तीन अतिरेक्यांना सोडण्याचे मान्य केल्यावर ते संपले होते .

Last Updated : Mar 9, 2022, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details