महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Indigenous Light Combat Helicopter : हवाई दलाला आज 'स्वदेशी हलके लढाऊ' हेलिकॉप्टर मिळणार ; लढाऊ पराक्रमाला मोठी चालना

यावर्षी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटी (CCS) च्या बैठकीत 3,887 कोटी रुपयांमध्ये 15 स्वदेशी विकसित एलसीएच खरेदी करण्यास मंजुरी देण्यात (Air force get indigenous light combat helicopter )आली.

light combat helicopter
स्वदेशी हलके लढाऊ हेलिकॉप्टर

By

Published : Oct 3, 2022, 10:13 AM IST

नवी दिल्ली :भारतीय हवाई दल (indian airforce) सोमवारी औपचारिकपणे देशाने विकसित केलेले हलके लढाऊ हेलिकॉप्टर इंडक्शन आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार (Air force get indigenous light combat helicopter) आहे. यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे, कारण हे मल्टीफंक्शनल हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्यास आणि शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे. LCH हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे विकसित केले गेले आहे. ते प्रामुख्याने उच्च उंचीच्या भागात तैनात करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

लढाऊ पराक्रमाला मोठी चालना -जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर आयोजित कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या उपस्थितीत हे हेलिकॉप्टर सामील करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. संरक्षण मंत्र्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, नवीन हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या 'लढाऊ पराक्रमाला' मोठी चालना मिळेल. 5.8 टन वजनाचे आणि ट्विन-इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरची यापूर्वीच अनेक शस्त्रे वापरण्यासाठी चाचणी घेण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी (indigenous Light Combat Helicopter) सांगितले.

15 स्वदेशी एलसीएच खरेदीस मंजुरी -विशेष म्हणजे, या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा कॅबिनेट कमिटी (CCS) च्या बैठकीत, 3,887 कोटी रुपयांमध्ये 15 स्वदेशी विकसित एलसीएच खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, यापैकी 10 हेलिकॉप्टर हवाई दलासाठी आणि पाच लष्करासाठी असतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की LCH 'अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर' ध्रुवशी साम्य आहे. ते म्हणाले की यात अनेक 'स्टेल्थ' वैशिष्ट्ये, बख्तरबंद सुरक्षा यंत्रणा, रात्री हल्ला आणि आपत्कालीन लँडिंग क्षमता आहे.

सिंग यांनी ट्विट केले (rajnath singh) की, मी उद्या, ३ ऑक्टोबर रोजी जोधपूर, राजस्थान येथे देशी बनावटीच्या पहिल्या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरच्या (LCH) समावेशन समारंभात सहभागी होणार आहे. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पराक्रमाला मोठी चालना मिळणार आहे. मी त्याची वाट पाहत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details