महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अफगाणिस्तान : भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 168 जणांना घेऊन मायदेशी परतले - तालिबान

अफगाणिस्तानातून भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 168 जणांना घेऊन गाझियाबादमध्ये दाखल झाले आहे. यात भारतीय राजदूत, अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि दुतावासामधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Indian Air Force's C-17 aircraft evacuates 168 people from Kabul
अफगाणिस्तान : भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 168 जणांना घेऊन मायदेशी परतले

By

Published : Aug 22, 2021, 10:30 AM IST

Updated : Aug 22, 2021, 10:37 AM IST

गाझियाबाद - अफगाणिस्तानमधील स्थिती आणखी वाईट होत असताना भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आज अफगाणिस्तानातून भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 168 जणांना घेऊन गाझियाबादमध्ये दाखल झाले आहे.

यापूर्वी भारताने अफगाणिस्तानमधील भारतीय राजदुतासह 200 भारतीयांना सी-17 या हवाईदलाच्या विमानाने भारतात आणले होते. तर गेल्या सोमवारी अफगाणिस्तानमधून 40 जण मायदेशी परतले होते. यात भारतीय राजदूत, अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि दुतावासामधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्यदल मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तालिबानींनी अफगाणिस्तानवर सत्ता मिळविली. अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. 20 वर्षांपूर्वीची परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांश सर्व मोठी गावे आणि शहरांसह काबुल ताब्यात घेतले आहे. काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेक जण मिळेल त्या मार्गाने देश सोडून जात आहेत.

तालिबान्यांनी ताब्यात घेतले होते भारतीय -

तालिबानींनी भारतीय नागरिकांच्या गटाला थांबवून काबुल विमानतळानजीक अज्ञात ठिकाणी शनिवारी नेले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केल्याचे एका पोर्टलने म्हटले होते. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी हे वृत्त फेटाळले होते. भारतीय सुरक्षित असल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले. तालिबानी दहशतवाद्यांनी काही भारतीयांना

Last Updated : Aug 22, 2021, 10:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details