महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हवाई दलातील लढाऊ मिग-21 विमान नाही दिसणार लढाईच्या रिंगणात, जाणून घ्या कारण - मिग२१ लढाऊ विमान

भारतीय वायुसेने मिग-21 बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. वायूसेनेने मिग-21 या लढाऊ विमानाच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. का बंदी घालण्यात आली याची माहिती जाणून घेऊ..

indian Air Force
indian Air Force

By

Published : May 21, 2023, 9:55 AM IST

नवी दिल्ली : भारतीय वायुसेने मिग-21 बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. वायूसेनेने मिग-21 या लढाऊ विमानाच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. वायूसेनेने 50 मिग-21 विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. वारंवार अपघात होत असल्यामुळे भारतीय वायुसेनेने हा निर्णय घेतला आहे.

का घेतला निर्णय :राजस्थानच्या हनुमानगड येथे एक मिग-21 लढाऊ विमानांचा अपघात झाला होता. त्यानंतर वायुसेनेने हा निर्णय घेतला आहे. सूरतगडमध्ये हवाई दलाच्या पथकात असलेल्या मिग-21 लढाऊ विमानाने 8 मे रोजी नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले होते. हनुमानगड येथे पोहचल्यानंतर या लढाऊ विमानाचा अपघात झाला होता. यात तीन जवान शहीद झाले होते. मिग-21 विमानाच्या अपघाताविषयी सांगताना अधिकारी म्हणाले की, मिग-21 लढाऊ विमानांमध्ये सध्या तांत्रिक बिघाड आला आहे. त्यांची तपासणी केली जात आहे. ज्यावेळी या विमानातील बिघाड निघून जाईल आणि उड्डाणासाठी हे विमान सुरक्षित आहेत, असे सांगण्यात येईल. त्यानंतरच हे विमाने उड्डाण भरतील. दरम्यान रशियाकडून घेण्यात आलेले मिग-21 विमान हनुमानगड अपघातानंतर चर्चेत आले होते. दरम्यान 1960 पासून ते आतापर्यंत 400 मिग-21 लढाऊ विमानांचा अपघात झाला आहे.

बाद केली जाणार मिग-21 विमाने : भारतीय हवाई दलाचा आधार म्हणून या मिग-21 विमानाकडे पाहिले जाते. भारतीय लष्कराची शक्ती वाढावी यासाठी या विमानांचा खरेदी करण्यात आली होती. भारताने रशियाकडून 870 विमानांची खरेदी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार हवाई दलाकडे आता 50 मिग-21 विमाने आहेत. 2025 पर्यंत हे विमाने बाद केली जाणार आहेत.

हेही वाचा -

  1. IAS Officer Molestation : महिला IAS अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी IRS अधिकाऱ्याला अटक
  2. Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्स्प्रेस बैलाला धडकली, अपघातात ट्रेनचे मोठे नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details