श्रीनगर :भारतीय हवाई दलाचे एक विमान मंगळवारी केंद्रशासित प्रदेश लडाखमधील लेह विमानतळाच्या धावपट्टीवर अडकले. त्यामुळे विमानतळावरून येणारी व जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली गेली आहेत.
सर्व विमानसेवा उद्या सकाळपर्यंत बंद : विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, C 17 ग्लोबमास्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे आज सकाळपासून खासगी कंपन्यांचे कोणतेही विमान विमानतळावरून टेक ऑफ किंवा लँडिंग करू शकले नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, 'सर्व खासगी विमान कंपन्यांना उद्या सकाळपर्यंत येथे त्यांची सेवा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्हाला आशा आहे की उद्या सकाळपर्यंत धावपट्टी मोकळी होईल आणि हवाई दलाची वाहतूक विमाने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
प्रवाशांना असुविधेचा फटका : विस्तारा कंपनीने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, लेह विमानतळावर निर्बंध लादल्यामुळे दिल्लीहून लेहला जाणारे त्यांचे विमान दिल्लीला परतत आहे. त्याच प्रमाणे एअर इंडियानेही आपले एक उड्डाण रद्द केले तर दुसरे श्रीनगरला वळवले आहे. दरम्यान, इंडिगोने लेहला जाणारी आपली चारही उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोच्या एका प्रवाशाने ट्विट केले की, '@IndiGo6E चे दुर्दैवी प्रवासी दिल्ली विमानतळावर अडकले आहेत कारण इंडिगोने लेहला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगो उद्या आम्हाला घ्यायला तयार नाही किंवा सामावून घ्यायलाही तयार नाही.'
विमान कंपन्यांनी ट्विटरवर प्रवाशांशी संपर्क साधला : एका यूजरने ट्विट केले की, 'रनवेवर आयएएफच्या तांत्रिक समस्येमुळे आज माझे चंदीगड ते लेहचे फ्लाइट रद्द करण्यात आले. विमानतळावर मला सांगण्यात आले की मला उद्या अतिरिक्त फ्लाइट उपलब्ध करून दिली जाईल. आता ग्राहक सेवा सांगत आहे की 23 मे पर्यंत कोणतीही फ्लाइट उपलब्ध नाही. तथापि, एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ट्विटरवर प्रवाशांशी संपर्क साधला आहे.
हेही वाचा :
- Fatehpur Road Accident : टँकरच्या धडकेत 9 जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
- Woman Intruder : पाकच्या संशयित महिलेचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी पाडला हाणून, गोळीबारात महिला ठार
- Minor Boy Murder In MP : अनैसर्गिक संबंधासाठी मित्राचा तीन अल्पवयीन मित्राकडून गळा आवळून खून