महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MIG 21 Crashed : राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळलं; 2 वैमानिकांचा मृत्यू - राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या बारमेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले ( MIG 21 Crashed In Barmer ) आहे. या अपघातात 2 वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

MIG 21 Crashed
MiG-21 fighter aircraft of the Indian Air Force crashed

By

Published : Jul 28, 2022, 10:27 PM IST

Updated : Jul 28, 2022, 11:04 PM IST

बारमेर ( राजस्थान ) -भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या बारमेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर त्याचे भाग एक किलोमीटर परिसरात पसरले असून, आगीचे लोळ उठले आहेत. या अपघातात 2 वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, विमानाच्या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली ( MIG 21 Crashed In Barmer ) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे मिग 21 हे लढाऊ विमान रात्री 9 वाजल्याच्या सुमारास जिल्ह्यातील बैतून पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भीमडा गावात कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. अपघात झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे पथक, अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले. तसेच, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनीही अपघातग्रस्त ठिकाणाकडे कूच केलं आहे. अपघात झाल्यानंतर वैमानिकाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

हेही वाचा -सावधान.. सिंगापूरच्या भूवैज्ञानिकांचा इशारा.. उत्तराखंडच्या हिमालयीन पट्ट्यात येऊ शकतो ८ रिश्टर स्केलचा भूकंप..

Last Updated : Jul 28, 2022, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details