नवी दिल्ली:परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी (1 DECEMBER 2022 TO 30 NOVEMBER 2023) G20 चे अध्यक्षपद (India will assume the Presidency of the G20) स्वीकारेल. या कालावधीत भारत 200 हून अधिक G20 बैठकांचे आयोजन करेल, अशी अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्राध्यक्ष व देशांच्या सर्व प्रमुखांच्या स्तरावरील G20 नेत्यांची शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. 'G20' किंवा 'ग्रुप ऑफ ट्वेंटी', हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक आंतरशासकीय मंच आहे. India Assume Presidency G20
१९ देशांचा समावेश : यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, यूएसए – आणि युरोपियन देशांचा, यूरोपीय संघ (ईयू) समावेश आहे. एकत्रितपणे G20 चा, जागतिक GDP च्या 85 टक्के, आंतरराष्ट्रीय व्यापारात 75 टक्के आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश वाटा आहे. त्यामुळे ते 'आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचे' प्रमुख व्यासपीठ बनले आहे. भारत सध्या G20 Troika (वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळात येणाऱ्या G20 प्रेसीडेंसी) चा हिस्सा आहे. ज्यामध्ये इंडोनेशिया, इटली आणि भारत यांचा समावेश आहे. या अध्यक्षपदाच्या काळात भारत, इंडोनेशिया आणि ब्राझील हे ट्रोइका तयार करतील. तीन विकसनशील देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ असेल, त्यामुळे भारतासाठी हे अध्यक्षपद एक मोठी शक्ती ठरेल, असे प्रकाशनात म्हटले आहे.