हरारे: भारत आणि झिम्बाब्वे ( IND vs ZIM 2nd Odi ) संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना हरारे येथील क्रिकेट स्टेडिमयवर खेळला गेला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 5 विकेट्सने धूळ चारत सलग दुसरा विजय ( India beat Zimbabwe by 5 wickets ) नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने भारतीय संघाला विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारतीय संघाने 25.4 षटकांत 5 गडी गमावत 167 धावा करत पूर्ण केले. तसेच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी -
या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. 31 धावांपर्यंत संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र, शॉन विल्यम्सने 42 धावांची खेळी करत संघाचा डाव काही काळ सांभाळला. पण झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत 161 धावांत गारद झाला. रायन बर्ले 39 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या ( Shardul Thakur took most 3 wickets ). त्याचबरोबर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.