केपटाउन :महिला T20 विश्वचषक 2023 मधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 150 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 19 षटकांत 3 गडी गमावून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. जेमिमा रॉड्रिग्जने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करीत नाबाद अर्धशतक झळकावले. तसेच रिचा घोष, राधा यादव यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.
भारताचा शानदार विजय :पाकिस्तानने दिलेल्या धांवाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून युस्तिका भाटिया, शेफाली वर्मा यांनी सुरवातीला फलंदाजी केली. शेफालीने 25 चेंडूत 33 धावा केल्या, तसेच 4 चौकार ठोकले. युस्तिकाने 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 12 चेंडूत 16 धावा केल्या. तसेच 2 चौकार ठोकले. जेमिमाने शानदार कामगिरी करत नाबाद अर्धशतक झळकावले. तीने 38 चेंडूंचा सामना करत 53 धावा केल्या. जेमिमानाने 8 चौकारांचा वर्षाव केला. रिचा घोषाने 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. तीने 5 चौकार मारले. या विश्वचषकात भारताने पाकिस्तानला धुळ चारत 150 धावांचे लक्ष 3 गडी गमावून शानदार विजय मिळवला.
पाकिस्तान संघाने 20 षटकांत केल्या 149 धावा : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध T20 विश्वचषक स्पर्धा केपटाऊनमध्ये जिंकला आहे. प्रथम नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार बिस्माहच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानने 149 धावा केल्या होत्या. बिस्मा मारूफने जोरदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते. बिस्मा मारूफने आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानची धावसंख्या वाढवली. बिस्मा मारूफ, आयशा नसीम यांच्या भागादारीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 20 षटकांत 149 धावांचा पल्ला गाठला होता.