दिल्ली - देशात आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 35 हजार 532 रुग्ण ( India New Corona Patient ) आढळले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत 15000 हजार कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तर 871 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला ( India Corona death ) आहे.
शनिवारी 3 लाख 35 हजार 939 रुग्णांना कोरोनावर मात केली ( India Corona Recover Patients ) असून, रिकव्हरी रेट 93.89 टक्क्यांवर गेला ( India Corona Recovery Rate ) आहे. सध्या 20 लाख 4 हजार 333 सक्रिय रुग्ण ( India Corona Active Patient ) आहेत. 26 जानेवारी पर्यंत 400 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.