दिल्ली - देशात आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 34 हजार 281 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. तर 893 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला ( India Corona death ) आहे. देशात आतापर्यंत 94 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात ( India Corona Recover Patient ) केली आहे.
गेल्या 24 तासांत 3 लाख 52 हजार 784 रुग्णांनी कोरोनावर मात केली ( India Corona Recover Patients ) आहे. सध्या 18 लाख 84 हजार 937 सक्रिय रुग्ण ( India Corona Active Patient ) आहे. देशाचा पॉझिटिव्हीटी रेट 14.50 टक्के ( India Positivity Rate ) आहे. देशातील 165.70 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंध लसीचा डोस देण्यात आला आहे.