दिल्ली -देशात आज 2 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या 24 तासांच देशभरात 2 लाख 51 हजार 209 रुग्ण आढळले ( India New Corona Patient ) आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 35000 कमी रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी 627 जणांचा मृत्यू झाला ( India Corona Death ) असून 3 लाख 74 हजार 443 रुग्ण कोरोनातून बरे झाले ( India Corona Patients Recover ) आहेत.
देशात सध्या 21 लाख 5 हजार 611 सक्रिय रुग्ण उपचारधीन असून, 15.88 टक्क्यांवर आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होणाचे प्रमाण वाढले नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.