नवी दिल्ली : India Saudi Bilateral Talk : सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद हे भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोमवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी द्विपक्षीय (Saudi Arabia Crown Prince) चर्चा केली. या द्विपक्षीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
विविध विषयांवर चर्चा : पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रकाशनानुसार, पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांच्यात धोरणात्मक भागीदारीवर चर्चा झाली. तसेच राजकीय, सुरक्षा, सामाजिक, सांस्कृतिक सहकार्य, आर्थिक आणि गुंतवणूक सहकार्य या विषयांवरही या द्विपक्षीय बैठकीत सखोल चर्चा झाली.
G२० चा जगाला फायदा : शिखर परिषदेत केलेल्या घोषणांचा जगाला फायदा होणार आहे. दोन्ही देशांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. सौदी अरेबिया हा पश्चिम आशियातील भारताचा प्रमुख धोरणात्मक भागीदार आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील एकूण संबंधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आपापली सुरक्षा भागीदारी मजबूत करण्यावरही भर देत असल्याचे सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांनी सांगितले.
व्यापार आणि संरक्षण संबंधांवर चर्चा : पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत भारत आणि सौदी अरेबियामधील द्विपक्षीय व्यापार आणि संरक्षण संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर चर्चा झाली. मोहम्मद बिन सलमान म्हणाले की, मला भारतात येऊन खूप आनंद होत आहे. मला G20 शिखर परिषदेसाठी भारताचे अभिनंदन करायचे आहे. भारत आणि सौदी अरेबिया हे उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करतील.
हेही वाचा -
- G20 Summit : भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन, ‘जग’ जिंकलं! मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं कौतुक
- Shahrukh Khan On G20 Summit : G20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल शाहरुखनं केलं मोदींचं अभिनंदन
- G२० Summit : जी20 परिषदेतील दिग्गजांनी राजघाटवर महात्मा गांधींना वाहिली आदरांजली; महाराष्ट्रातील बापू कुटीची प्रतिमा दिली भेट