महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Omicron first death : भारतात ओमायक्रॉनचा पहिला बळी ; राजस्थानमध्ये ७३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - उदयपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश खराडी यांची माहिती

भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूमुळे (India reports first death due to Omicron)पहिला मृत्यू (first death from Omicron) राजस्थानच्या उदयपूर मध्ये मागील आठवढ्यात झाला आहे. ज्याची पुष्टि बुधवारी नमुने तपासणी करण्यात आल्यानंतर केली. य़ाबाबत आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

Omicron
ओमायक्रॉन

By

Published : Jan 6, 2022, 10:04 AM IST

नवी दिल्ली: कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूमुळे भारतात ओमायक्रॉनचा ( India reports first death due to Omicron ) पहिला मृत्यू ( first death from Omicron ) गेल्या आठवड्यात राजस्थानच्या उदयपूरमध्ये झाला होता. ज्याची बुधवारी नमुन्याची चाचणी केल्यानंतर पुष्टी झाली. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल ( Joint Secretary in the Union Health Ministry, Lav Agarwal ) यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, उदयपूरमधील मृत्यू हा 'तांत्रिकदृष्ट्या' ओमायक्रॉनशी संबंधित आहे.

त्यांनी सांगितले, 'ओमायक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. रूग्ण वृद्ध व्यक्ती होते आणि त्यांना मधुमेहासह इतर आजार होते आणि प्रोटोकॉलनुसार सह-विकृती तसेच संसर्गासाठी उपचार केले जात होते. अग्रवाल म्हणाले, 'आमची मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, जर कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला तर तो कोविड-19 मुळे झालेला मृत्यू मानला जातो. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनचा त्रास असल्याचे आढळून आले. जरी ते उशिरा आढळून आले, तर आम्ही त्याला ओमायक्रॉन संसर्गाचे प्रकरण मानतो.

राजस्थानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 73 वर्षीय व्यक्तीच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंगने ओमायक्रॉनची पुष्टी केली. त्यांची कोविडची दोनदा चाचणी करण्यात आली होती. ज्याचा अहवाल नकारात्मक आला होता आणि त्यानंतर रुग्णाचा उदयपूरच्या रुग्णालयात 31 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. उदयपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMHO) डॉ. दिनेश खराडी यांनी सांगितले की, कोविड नंतर त्या व्यक्तीचा न्यूमोनियाने मृत्यू झाला आणि तो आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हायपोथायरॉईडीझमने ग्रस्त होता.

15 डिसेंबर रोजी या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आणि त्याला ताप, खोकला आणि राइनिइटिस सारखी लक्षणे दिसू लागली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या चाचणीचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालात ओमायक्रॉनची पुष्टी झाली. तसेच 21 डिसेंबर आणि 25 डिसेंबरला तपासणीत अहवाल निगेटिव्ह आला.

ABOUT THE AUTHOR

...view details