महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात गेल्या २४ तासांमध्ये ९३ हजार कोरोना रुग्णांची नोंद; ५१३ जणांचा मृत्यू - भारत कोरोना रुग्णसंख्या

काल दिवसभरात एकूण 513 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 64 हजार 623 झाली आहे. सध्या देशातील 6 लाख 91 हजार 597 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 29 हजार 289 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत...

India reports 93,249 new COVID-19 cases, 513 deaths in last 24 hours
देशात गेल्या २४ तासांमध्ये ९३ हजार कोरोना रुग्णांची नोंद; ५१३ जणांचा मृत्यू

By

Published : Apr 4, 2021, 12:09 PM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 93 हजार 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी, 24 लाख, 85 हजार 509 वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 513 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 64 हजार 623 झाली आहे. सध्या देशातील 6 लाख 91 हजार 597 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 29 हजार 289 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 66 हजार 760 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 24 कोटी, 81 लाख, 25 हजार, 908 एवढी झाली आहे. तसेच आतापर्यंत देशभरात एकूण ७ कोटी ५९ लाख ७९ हजार ६५१ लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा :कसला बर्ड फ्लू अन् कसलं काय; तामिळनाडूमध्ये बिर्याणीची डिमांड झाली 'हाय'!

ABOUT THE AUTHOR

...view details