नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट असून दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 67 हजार 208 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,03,570 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 2,330 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
देशात आतापर्यंत एकूण 2 कोटी 84 लाखांहून अधिक नागरिक आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात आता 8 लाख 26 हजार 740 नागरिकांवर उपचार सुरू आहे. तसेच देशात विक्रमी कोरोना चाचण्या होत आहेत. बुधवारी 19,31,249 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 38,52,38,220 चाचण्या पार पडल्या आहेत.