महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना कहर! नव्या 62 हजार 714 कोरोना रुग्णांची नोंद - कोरोना रुग्णांची संख्या

कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 62 हजार 714 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 312 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर 28 हजार 739 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Mar 28, 2021, 1:23 PM IST

नवी दिल्ली - गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोनाच्या प्रसाराला सुरवात झाली होती. याला आता एक वर्ष होत आहे. मात्र, कोरोना अद्याप आटोक्या आलेला नाही. लॉकडाऊननंतर परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्याचे चित्र होते. रुग्ण संख्या कमी झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 62 हजार 714 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 312 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर 28 हजार 739 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत एकूण 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यात 1 कोटी 13 लाख 23 हजार 762 जण कोरोनामुक्त झाले. तर सध्या 4 लाख 86 हजार 310 जणांवर उपचार सुरू आहेत. याचबरोबर कोरोनामुळे 1 लाख 61 हजार 552 जणांचा बळी गेला आहे.

कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू झाले असून देशात आतापर्यंत 6 कोटी 2 लाख 69 हजार 782 जणांना कोरोना लस टोचवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 24,09,50,842 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर शनिवारी 11,81,289 चाचण्या घेण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details