महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाच्या 58 हजार 419 नव्या रुग्णांची भर; 2330 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत 87,619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत देशातली रुग्णसंख्या दिवसाला साडेतीन लाखांपर्यंत पोहोचली होती. आता रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत आहे

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jun 20, 2021, 2:08 PM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीची गती काहीशी कमी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 58,419 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 1576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 87,619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत देशातली रुग्णसंख्या दिवसाला साडेतीन लाखांपर्यंत पोहोचली होती. आता रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत आहे

देशातील आजची कोरोना स्थिती :

  • एकूण कोरोना रुग्ण : 2,98,81,965
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,87,66,009
  • एकूण सक्रिय रुग्ण : 7,29,243
  • एकूण मृत्यू : 3,86,713
  • आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 27,66,93,572

देशातील कोरोना रुग्णांचा सक्रीय दर 2.44 टक्के, मृत्यू दर हा 1.29 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 96.27 टक्के इतका आहे. देशात विक्रमी कोरोना चाचण्या होत आहेत. शुक्रवारी 18,11,446 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 39,10,19,083 चाचण्या पार पडल्या आहेत.

कोरोनाची तिसरी लाट दीड ते दोन महिन्यांत येणार -

महाराष्ट्र टास्क फोर्सने कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिल्यानंतर एम्सनेही हा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. जर कोरोनाच्या काळात योग्य नियमांचे पालन करणे व गर्दी टाळणे नाही केल्यास कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. येत्या सहा ते आठ आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी दिला आहे. भारतामधील महामारीतज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट टळू शकणार नसल्याचे संकेत दिले होते. ही लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरपासून येईल, असे महामारीतज्ज्ञांनी म्हटले होते. कोरोनाची लाट भारतामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात आल्यानंतर देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह कोरोनावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. सध्या, देशातील नवीन कोरोनाबाधितांचे व कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details