नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. परिस्थिती आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसताच, पुन्हा कोरोनाचा एखादा नवा व्हेरिएंट खळबळ माजवतो. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली ( India reports fresh COVID cases ) असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात 25 हजार 920 नव्या रुग्णांची नोंद आहे. तर 492 मृत्यू झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून 66 हजार 254 रिकव्हर झाले आहेत. देशातील विविध रुग्णालयांमध्ये 2 लाख 92 हजार 292 जणांवर ( Corona infection in India ) उपचार सुरू आहेत.
सध्याचा दररोजचा रुग्ण सकारात्मकता दर 2.07 ऐवढा आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 77 हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 510905 जणांचा कोरोनामुळे मूत्यू झाला. तर यासोबतच कोरोनावरील लसीकरण सुरू झाल्यापासून आजपर्यंत तब्बल 1,74,64,99,461 जणांचे लसीकरण झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. मात्र जगातील बहुतांश लोक याला जैविक युद्ध मानत आहे. जगभरातील लोकांमध्ये यामुळेच दहशत निर्माण झाली आहे.