नवी दिल्ली: मागील अडीच वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आहे. रोज सातत्याने कोरोनाची लागण झालेल्या लोकांची वाढत आहे. तसेच भारतात काही दिवसापासून नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमधे मोठी घट नोंदवली जात होती. मात्र मागील चोवीस तासात म्हणजेच बुधवारी कोरोनाची लागण झालेल्या लोकांचा आकडा वाढला आहे. कारण मंगळवारी भारतात 1 लाख 61 हजार 386 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामध्ये बुधवारी वाढ दिसून आली. बुधवारी 1,72,433 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.
India Corona Update: 24 तासात 1 लाख 72 हजार 433 नवीन कोरोना रुग्ण, 1008 मृत्यू - भारताचा कोरोना पॉझिटिव्ह रेट
मागील चोवीस तासात नवीन कोरोना रुग्णांची संख्या (Number of corona patients increased) वाढली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी 6.8% जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
मंगळवारच्या तुलनेत बुधवारी म्हणजे काल 6.8% जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु मृत्यूच्या संख्येत मात्र घट (Decrease in corona deaths) दिसून आली आहे. मंगळवारी 1,733 मृत्यूची नोंद झाली होती. ही घटून बुधवारी 1008 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15,33,921 आहे. तसेच आतापर्यंत भारतात 4,98,983 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर सध्या भारताचा कोरोना पॉझिटिव्ह रेट (India's corona positive rate) 10.99% आहे. कोरोना महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी देशात आतापर्यंत 167.87 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच बुधावारी 2,59,107 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.