हैदराबाद - देशातील कोरोनाची दुसरी लाट संपूर्णपणे ओसरलेली नाही. देशात नवीन 35,499 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 447 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात आजवर एकूण 3,19,69,954 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 4,28,309 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सकाळी 8 वाजता जाहीर केली आहे. देशात 4,02,188 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार 8 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणीकरिता 48,17,67,232 नमुने घेण्यात आले आहेत. तर रविवारी कोरोना चाचणीकरिता 13,71,871 नमुने घेण्यात आले आहेत.
हेही वाचा-मडगाव कुंकल्लीत वर्कशॉपला आग लागून सहा गाड्या जळून खाक