दिल्ली :विविध राज्यातील तसेच देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Narendra Modi Meeting with State CMs) आढावा बैठक घेतली. यावेळेस त्यांनी लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याचेही स्पष्ट केले. केंद्र आणि राज्यांमध्ये आर्थिक निर्णयात ताळमेळ गरजेचा आहे. आणि पेट्रोल डिझेलवरील वाढत्या किमती लक्षात घेऊन महाराष्ट्र, बंगाल केरळ या राज्यांनी राज्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे असेही सांगितले.
पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. आरोग्य सचिव राजेश भूषण कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राईव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग याबाबत माहिती दिली.