नवी दिल्ली :संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तांत्रिक बिघाडामुळे भारतातील एक क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडले. (The missile landed in Pakistan) या घटनेबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करतो. पाकिस्तानी लष्कराने एक दिवसापूर्वीच भारताकडून क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला होता. यामुळे काही भागात नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पडले. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितले की, भारताकडून एक क्षेपणास्त्रासारखी वस्तू वेगाने आली. त्याच्या पडझडीमुळे काही भागात नुकसान झाले.
Missiles Landed In Pakistan: पाकिस्तानात क्षेपणास्त्र पडल्यानंतर भारताने दिले चौकशीचे आदेश - Ministry of Defense
भारत सरकारने शुक्रवारी भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्याच्या (Missiles Landed In Pakistan) घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश (Order for a high-level inquiry) दिले आहेत, संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) एका निवेदनात म्हटले आहे की, नियमित देखभाल दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात जाऊन पडले. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
गैर-लष्करी भागात नुकसान झाल्याचेही पाकिस्तानने सांगितले आहे. मात्र, त्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. ते पाक सीमेच्या 124 किमी आत पडले. पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्याचा माग काढला. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यानेही स्पष्ट केले आहे की या क्षेपणास्त्रात कोणताही दारुगोळा नव्हता त्या मुळे ते सराव आणि देखभालीच्या वेळी उडले असण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराने सांगितले की, खरे तर ते राजस्थानमध्ये पडायचे होते, पण ते पाकिस्तानच्या मिया चन्नू भागात पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्षेपणास्त्र जिथे पडले तेथून 160 किमी दूर दहशतवादी संघटना जैशचा प्रमुख मसूद अझहरचे घर आहे.
भारत सरकारने शुक्रवारी निशस्त्र भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने शुक्रवारी इस्लामाबादमधील भारतीय राजदूताला पाचारण केले होते आणि या बेजबाबदार घटनेचा निषेध नोंदवला. त्यांनी असेही म्हटले होते की अशा बेजबाबदार घटनांमुळे प्रादेशिक अशांतता आणि स्थिरता वाढु शकते. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) गुरुवारी दावा केला की भारतीय ‘सुपरसॉनिक प्रोजेक्टाइल’ने 3 मिनिटे 44 सेकंदांसाठी पाकिस्तानी हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि पाकिस्तानच्या हद्दीत 124 किमी आत जाऊन आदळले.