महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भारत आता लोकशाही राष्ट्र राहिले नाही'; राहुल गांधींचे ट्विट - राहुल गांधी ट्विट

"'व्ही-डेम' या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामध्ये त्यांनी भारताचा समावेश 'निवडणूक लोकशाही' या सूचीमध्ये न करता, 'निवडणूक हुकूमशाही' या सूचीमध्ये केला आहे." अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले...

"India no longer a democracy", tweets Rahul Gandhi
'भारत आता लोकशाही राष्ट्र राहिले नाही'; राहुल गांधींचे ट्विट

By

Published : Mar 11, 2021, 5:31 PM IST

हैदराबाद : भारत देश आता 'लोकशाही राष्ट्र' राहिला नसल्याचे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. स्वीडनमधील व्ही-डेम या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाचा दाखला देत राहुल यांनी असे वक्तव्य केले.

"'व्ही-डेम' या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामध्ये त्यांनी भारताचा समावेश 'निवडणूक लोकशाही' या सूचीमध्ये न करता, 'निवडणूक हुकूमशाही' या सूचीमध्ये केला आहे." अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

जगातील सर्वात मोठा लोकशाही असणार देश ही ओळख गेली - अहवाल

निवडणूक हुकूमशाही हा जगातील सर्वात साधारण असा शासन प्रकार आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या देशात आता निवडणूक लोकशाही न राहता, निवडणूक हुकूमशाही आली आहे. गेल्या दशकभरात जगाती उदारमतवादी लोकशाही असलेल्या राष्ट्रांची संख्या ४१ वरुन ३२वर गेली आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

हेही वाचा :नरेंद्र मोदींच्या आईने घेतली कोरोना लस; पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details