महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 24, 2023, 10:20 AM IST

ETV Bharat / bharat

India Monsoon Flood Update : उत्तर आणि पश्चिम भागात 25 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात 25 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गोवा, कोकण आणि महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी होणार आहे.

Weather Update
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात 25 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर देशाच्या मध्यवर्ती भागात 27 जानेवारीपर्यंत साधारण ते मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण, घाट माथ्यावरील प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील 2-3 दिवसात मान्सून पश्चिमेकडून हळूहळू उत्तरेकडे सरकण्याची दाट शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

उत्तर पश्चिम भारत :हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानच्या भागांमध्ये 27 जुलैपर्यंत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 25 ते 27 जुलै दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम राजस्थानमध्ये 25 आणि 26 तारखेला पाऊस अपेक्षित आहे. 26 आणि 27 जुलैला जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबादच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • मध्य भारत :मध्य भारताच्या विविध भागात 27 जुलैपर्यंत हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 26 आणि 27 जुलै 2023 रोजी दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • पश्चिम भारत :कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरील भागात 27 जुलैपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. 25 जुलैपर्यंत मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमधील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

दक्षिण भारत : किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 25 ते 27 जुलै दरम्यान रायलसीमा येथे पावसाची शक्यता आहे. 24 जुलै रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. 24 रोजी कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 तारखेला आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशात पावसाची शक्यता आहे. तेलंगाणातील विविध भागात 25 ते 27 दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे.

  • पूर्व भारत :ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटांवर 27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: ओडिशात 25 ते 27 जुलै दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • ईशान्य भारत :अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात 27 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Weather Update : राज्यात 'या' तारखेपर्यंत बरसणार; कमी दाबाचा पट्टा तयार
  2. Monsoon Update: राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'या' ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details