मॉस्को :युक्रेनने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला केल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या म्हणण्यानुसार, पुतिन यांना मारण्याच्या उद्देशाने युक्रेनने हे पाऊल उचलले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रशियाने म्हटले आहे. ही घटना काल (दि. 2 मे)रोजीची आहे. याबाबत रशियाने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी दोन्ही ड्रोन पाडल्याचे सांगण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले. रशियानेही या घटनेनंतर मोठे पाऊल उचलू शकते, असे स्पष्ट केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोठे पाऊल म्हणजे रशिया युक्रेनवर बदला घेऊ शकतो असेच बोलले जात आहे.
9 मे रोजी विजय दिवस : हा हल्ला किती मोठा असेल, याची कोणालाच कल्पना नाही. तसे, रशियाने सांगितले की ही घटना असूनही, 9 मे रोजी परेडचा कार्यक्रम पूर्ववत केला जाईल, त्यात कोणतेही बदल केले गेले नाहीत. रशिया 9 मे रोजी विजय दिवस साजरा करतो. या दिवशी रशियन लोकांनी हिटलरच्या सैन्याला हुसकावून लावण्यासाठी कारवाई केली. यात शहीद झालेल्या सर्व लोक आणि सैन्याच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा केला जातो.