महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चांगली बातमी! 43 हजार 733 रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट वाढून 97.18 टक्क्यांवर - corona count today

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 43,733 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 47,240 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 930 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.

COVID
कोरोना

By

Published : Jul 7, 2021, 1:07 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट असून दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 43,733 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 47,240 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 930 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...

  • एकूण रुग्ण : 3,06,63,665
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,97,99,534
  • सक्रिय रुग्ण संख्या : 4,59,920
  • एकूण मृत्यू : 4,04,211
  • एकूण लसीकरण : 36,13,23,548

देशात आतापर्यंत एकूण 2,97,99,534 लाख नागरिक आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात आता 4,59,920 नागरिकांवर उपचार सुरू आहे. तसेच देशात विक्रमी कोरोना चाचण्या होत आहेत. मंगळवारी 19,07,216 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 42,33,32,09 चाचण्या पार पडल्या आहेत.

36 कोटींपेक्षा जास्त जणांचे लसीकरण -

देशातील कोरोना मृत्यूदर 1.32 टक्क्यांवर पोहोचला असून रिकव्हरी रेट 97टक्क्यांहून जास्त आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचं प्रमाण 1.50टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. तर बुधवारी भारतात कोविड लसीचे 36,05,998 डोस टोचवण्यात आले. तर आतापर्यंत 36,13,23,548 जणांचे लसीकरण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details