महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chemicals Exports : भारत जगात सहाव्या क्रमांकावर! रासायनिक निर्यातीने गाठला उच्चांक

वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी (दि. 27 एप्रिल)रोजी सांगितले की, कृषी रसायने तसेच काही विशेष रसायने यांसारख्या क्षेत्रांतील चांगल्या कामगिरीमुळे रसायनांची निर्यात (2021-22)मध्ये (USD 29.3)अब्जपर्यंत पोहोचली आहे. (Chemicals Exports) तसेच, भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा रसायने उत्पादक देश झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

रासायनिक निर्यातीने गाठला उच्चांक
रासायनिक निर्यातीने गाठला उच्चांक

By

Published : Apr 28, 2022, 10:36 AM IST

नवी दिल्ली - भारताच्या रासायनिक निर्यातीत गेल्या सात वर्षांत 100% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. (India Chemical Exports Hit) तसेच भारतीय रासायनिक निर्यातीने गेल्या आर्थिक वर्षात (29)अब्ज पेक्षा जास्त विक्रमी उच्चांक गाठला आहे. (2021-22)मध्ये, भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीने 418 अब्ज डॉलर्सचा सार्वकालिक उच्चांक गाठला आणि भारताने (29.29) अब्ज किमतीचे रसायने निर्यात केली, जे (2013-14)मध्ये 14.21 बिलियन असताना निर्यात केलेल्या रसायनांच्या तुलनेत (106%)ने अधिक आहेत.

यामधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सेंद्रिय, अजैविक रसायने, कृषी रसायने, रंग आणि डाई इंटरमीडिएट्स आणि विशेष रसायनांच्या शिपमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे रसायनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारतीय रासायनिक उद्योग जागतिक स्तरावर महत्वाचा देश ठरला आहे. (Largest Producer Of Chemicals) भारत देश जगातील सहाव्या क्रमांकाचा आणि आशियातील तिसरा सर्वात मोठा रसायने उत्पादक देश ठरला आहे. रसायनांचा निर्यातदार म्हणून भारत सध्या रसायनांच्या जागतिक निर्यातीत 14 व्या स्थानावर आहे. सद्यस्थितीत, भारत हा रंगांचा जगातील आघाडीचा उत्पादक आहे आणि कमोडिटीच्या जागतिक निर्यातीमध्ये सुमारे 16-18% योगदान भारताचे आहे. भारतीय रंगाची ९० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते.

नवीनतम उत्पादन आकडेवारीनुसार, भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा कृषी रसायनांचा उत्पादक देश आहे. तर जगातील निम्म्याहून अधिक तांत्रिक दर्जाच्या कीटकनाशकांचे उत्पादन करतो. (Leading Producer of Agrochemicals) भारत आपल्या कृषी रसायनांच्या उत्पादनांपैकी निम्मे इतर देशांना निर्यात करतो. भारत हा जगातील एरंडेल तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. सध्या या विभागातील एकूण जागतिक निर्यातीपैकी जवळजवळ 85-90% साठी जबाबदार आहे.

आज, भारतीय रसायने 175 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात आणि शीर्ष गंतव्यस्थानांमध्ये अमेरिका आणि चीनसह जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. (India Sixth Largest Producer Of Chemicals) या दोन बाजारांव्यतिरिक्त, भारत तुर्की, रशिया आणि ईशान्य आशियाई देश आणि हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, मकाओ आणि मंगोलिया यासारख्या बाजारपेठांना रसायनांचा पुरवठा करतो.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, रासायनिक निर्यातीत वाढ सततच्या प्रयत्नांमुळे झाली आहे. उदाहरणार्थ, (CHEMEXCIL)द्वारे मार्केट ऍक्सेस इनिशिएटिव्ह योजनेंतर्गत अनुदानाचा वापर करून, विविध देशांमध्ये (B2B)प्रदर्शने आयोजित करून, उत्पादन-विशिष्ट आणि विपणन मोहिमेद्वारे नवीन संभाव्य बाजारपेठांचा शोध घेऊन भारतीय दूतावासांच्या सक्रिय सहभागाने आर्थिक तरतूद करून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. इतर गोष्टींसह परदेशातील उत्पादन नोंदणीमध्ये वैधानिक अनुपालनासाठी मदत होते.

"उच्च मालवाहतूक दर आणि इतर गोष्टींबरोबरच कंटेनरचा तुटवडा यांसारख्या लॉजिस्टिक आव्हानांना न जुमानता ही निर्यात वाढ साध्य झाली आहे," असे अधिकारी म्हणाले. रासायनिक उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील लहान आणि मध्यम निर्यातदारांना फायदा झाला आहे. वर्षानुवर्षे, भारताचा रासायनिक उद्योग आधुनिक जागतिक दर्जाचा रासायनिक उद्योग म्हणून उदयास येण्यासाठी नवीन रेणू, तंत्रज्ञानातील नवकल्पना, उत्पादन प्रोफाइल आणि गुणवत्ता याद्वारे आधुनिकीकरण करत आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा -Elon Musk : ट्विटरच्या सार्वजनिक विश्वासासाठी ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असावे -इलॉन मस्क

ABOUT THE AUTHOR

...view details