महाराष्ट्र

maharashtra

कोरोना राष्ट्रीय आणीबाणी...बाजारातील आर्थिक गणिते करण्याची वेळ नाही!

By

Published : Apr 30, 2021, 7:07 PM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम महेश म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2021 पर्यंत 30 कोटी लोकांचे लसीकरण होईल, असा दावा केला होता. सध्या, केवळ 10 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. कोरोना महामारी ही राष्ट्रीय आणीबाणी आहे. ही बाजारातील आर्थिक गणिते करण्याची वेळ नाही.

जयराम रमेश सॅम पित्रोदा
जयराम रमेश सॅम पित्रोदा

नवी दिल्ली - केवळ विषाणुनेच नव्हे तर आदर्शवादाच्या विषाणुनेही आपल्याला विळखा घातल्याचे परखड मत काँग्रेसचे नेते जयराम महेश यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा आणि जयराम महेश यांनी आज ऑनलाईन कॉन्फरन्समधून चर्चा केली. देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना लसीकरण वेगाने वाढविण्याची गरज यावेळी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी काही मार्ग सुचविले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम महेश म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2021 पर्यंत 30 कोटी लोकांचे लसीकरण होईल, असा दावा केला होता. सध्या, केवळ 10 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. कोरोना महामारी ही राष्ट्रीय आणीबाणी आहे. ही बाजारातील आर्थिक गणिते करण्याची वेळ नाही.

हेही वाचा-पुण्यातील वेश्यांना ही ब्रिटिश तरुणी पुरवते जेवणाचे डबे, ६ हजार गरजूंना केली मदत

अडचण काय आहे, हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्ग सापडत नाही-

आपल्याला केवळ कोरोना विषाणुचा विळखा नाही. आदर्शवादाच्या विषाणुनेही विळखा घातल्याने सार्वजनिक क्षेत्राकडे संशयाने पाहिले जाते. आपण लोकांचे लसीकरण करण्याची गरज आहे. सरकार पूर्णपणे कोसळले आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ही नाकारल्याच्या स्थितीत आहेत. जोपर्यंत तुम्हाला अडचण काय आहे, हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्ग सापडत नाही. यावेळी सर्वांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे.

हेही वाचा-'सांड की आँख'मधील शूटर दादी चंद्रो तोमर यांचे निधन, भूमी पेडणेकरने केली होती भूमिका

राष्ट्रीयस्तरावर तज्ज्ञांच्या टीमची गरज

कोरोना महामारीला रोखण्यासाठी सल्ला देताना सॅम पित्रोदा म्हणाले, की आपण लोकांचे ऐकले पाहिजे. आपण इतरांना कल्पना आणि इतर गोष्टींसाठी आमंत्रित केले पाहिजे. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन असायला पाहिजे. जे क्षेत्राबाबत तज्ज्ञ आहेत, अशा तज्ज्ञांची विश्वसनीय राष्ट्रीय टीम पाहिजे. त्यांनी सरकारच्यावतीने रोज पत्रकार परिषद घेऊन सत्य स्थिती सांगायला हवी. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, अशी लोकांना त्यांनी माहिती दिली पाहिजे. ही माहिती राजकीय असू शकत नाही. तर प्रोफेशनल असायला हवी.

पोलिओ लसीकरणाच्या जनजागृतीकरता सर्व राज्य सरकारे, खासदार, आमदार, स्थानिक माध्यमे यांना विश्वासात घेण्यात आले होते, याची आठवण माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी करून दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details