महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Country Factory Output : जानेवारी '2022' मधील 1.5% च्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये IIP 1.7% वाढला - देशातील फॅक्टरी आउटपुट

देशातील फॅक्टरी आउटपुट (IIP)ने यावर्षी फेब्रुवारीमध्ये आपला उच्चांक वाढवला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, (फेब्रुवारी 2022)मध्ये (IIP) 1.7 टक्‍क्‍यांनी वाढला आहे, जो या वर्षी जानेवारीत 1.5 टक्‍क्‍यांचा सुधारित अंदाज होता.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Apr 14, 2022, 11:16 AM IST

नवी मुंबई - देशातील फॅक्टरी आउटपुट (IIP) या वर्षी वाढला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवारी (दि. 12 एप्रिल)रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी (2022)मध्ये IIP 1.7 टक्‍क्‍यांनी वाढला आहे, जो या वर्षी जानेवारीत 1.5 टक्‍क्‍यांचा सुधारित अंदाज होता.

वीजनिर्मितीत वाढ झाली - सरकारी आकडेवारीनुसार, खाण क्षेत्रातील वाढ फेब्रुवारी 2022 मध्ये 4.5 टक्‍क्‍यांवर होती, जी फेब्रुवारी 2021 मधील 4.4 टक्‍क्‍यांनी कमी-कमी होत गेली. फेब्रुवारी 3.4 टक्‍क्‍यांच्या घटलेल्या तुलनेत उत्पादन क्षेत्राची 0.8 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. जानेवारीत ०.९ टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ४.५ टक्के वाढ झाल्याने वीजनिर्मितीत वाढ झाली आहे.

नैसर्गिक वायू आणि खते आहेत - IIP हा एक निर्देशांक आहे जो अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या वाढीचा तपशील देतो. आयआयपीमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तूंच्या वजनाच्या 40 टक्क्यांहून अधिक आठ प्रमुख उद्योगांचा समावेश आहे. ही वीज, पोलाद, रिफायनरी उत्पादने, कच्चे तेल, कोळसा, सिमेंट, नैसर्गिक वायू आणि खते आहेत.

फेब्रुवारीमध्ये सकारात्मक वाढ - इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चचे प्रमुख अर्थतज्ज्ञ सुनील सिन्हा म्हणतात की, औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ (IIP) चालू आर्थिक सुधारणांची बाब लक्षात घेता हे चित्र निराशाजनकच आहे असही ते म्हणाले आहेत. उदाहरणार्थ, IIP मधील सर्वात मोठा घटक असलेल्या उत्पादन क्षेत्राने केवळ 80 बेस पॉइंट्सची वाढ नोंदवली, तर खाणकाम आणि वीजेने फेब्रुवारीमध्ये वार्षिक आधारावर 4.5% ची वाढ नोंदवली. वापरावर आधारित वर्गीकरणानुसार, प्राथमिक वस्तू, भांडवली वस्तू, मध्यवर्ती वस्तू आणि पायाभूत वस्तू या सहा पैकी चार विभागांमध्ये फेब्रुवारीमध्ये सकारात्मक वाढ दिसून आली आहेत असही ते म्हणाले आहेत.

लवकर निराकरण होण्याची चिन्हे दिसत नाहीत - त्याचप्रमाणे, पायाभूत सुविधांच्या वस्तूंचे उत्पादन वगळता, या वर्षी फेब्रुवारीमध्ये इतर सर्व वापर-आधारित विभागांचे कारखाना उत्पादन कोविडपूर्व पातळीपेक्षा कमी होते. गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळलेले औद्योगिक उत्पादन, या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकामुळे पुढील काही महिने कमकुवत राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये लवकर निराकरण होण्याची चिन्हे दिसत नाहीत अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -fire Chemical Company In Andhra : रासायनिक कंपनीला आग; सहा जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details