महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India Expelled Chinese Journalist : भारतातील सर्व चिनी पत्रकारांची हकालपट्टी, हेरगिरीचा होता आरोप

मोदी सरकारने सर्व चिनी पत्रकारांना भारतातून हाकलून दिले आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती आली आहे की भारतात एकही चिनी पत्रकार नाही.

India Expelled Chinese Journalist
भारतातून चिनी पत्रकारांची हकालपट्टी

By

Published : Jun 27, 2023, 10:13 PM IST

नवी दिल्ली : भारत सरकारने देशातील सर्व चिनी पत्रकारांची हकालपट्टी केली आहे. भारताने कोणत्याही चिनी पत्रकारांच्या व्हिसाची मुदत वाढवली नाही, परिणामी चीनचा शेवटचा पत्रकार गेल्या आठवड्यात नवी दिल्ली सोडून चीनला परतला. 1980 नंतर चीनचा एकही पत्रकार भारतात नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या चीनमध्ये भारतातील एकमेव पत्रकार आहे. तो बीजिंगमध्ये आहे.

चिनी पत्रकारांच्या व्हिसाची मुदत वाढवली नाही : 12 जून रोजी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, भारतीय पत्रकार चीनमध्ये काम करू शकतात. परंतु जर भारताने आमच्या पत्रकारांच्या व्हिसाची मुदत वाढवली नाही, तर आम्ही देखील तसेच पावले उचलू. चीनच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही 2020 पासून चिनी पत्रकारांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज करत आहोत. परंतु भारत व्हिसाची मुदत फार कमी कालावधीसाठी वाढवत आहे. कधी ते तीन महिन्यांसाठी वाढवतात, तर कधी फक्त एक महिना वाढवतात. म्हणूनच एकेकाळी आमचे 14 पत्रकार नवी दिल्लीत असायचे, पण आज एकच पत्रकार उरला आहे.

'चिनी पत्रकार भारतात हेरगिरी करतात' : या घटनाक्रमावर चिनी घडामोडींची जाण असलेले ज्येष्ठ पत्रकार ब्रह्म चेल्लानी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा घटनेमुळे कोणाचे नुकसान होईल हे संपूर्ण जगाला माहीत आहे, असे त्यांनी लिहिले आहे. चेल्लानी म्हणाले की, भारतीय पत्रकार चीनमध्ये फार कमी फिल्ड रिपोर्टिंग करतात. माहितीसाठी ते सरकारी प्रेस रिलीज, ग्लोबल टाइम्स आणि स्थानिक वर्तमानपत्रांवर अवलंबून असतात. परंतू चिनी पत्रकार भारतात केवळ फिल्ड रिपोर्टिंगच करत नाहीत तर चीनसाठी हेरगिरीही करत आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे कोणाचे नुकसान होणार आहे, ही बाब कोणापासून लपून राहिलेली नाही. त्यांनी असेही लिहिले आहे की 2020 मध्ये अमेरिकेनेही चीनविरोधात अशीच पावले उचलली होती.

चीनमध्ये फक्त एक भारतीय पत्रकार आहे : या वर्षी एप्रिलमध्ये चीनने चार पैकी दोन भारतीय पत्रकारांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यास नकार दिला होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीला भारताने एका चिनी पत्रकाराला दिल्ली सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर पुन्हा चीनने आणखी एका पत्रकाराचा व्हिसा रद्द केला. त्यामुळेच सध्या चीनमध्ये फक्त एक भारतीय पत्रकार उरला आहे. तर आता भारतात एकही चिनी पत्रकार नाही. या विषयावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही बाजू एकमेकांच्या संपर्कात आहेत.

हेही वाचा :

  1. Mumbai Bomb Blast : 26/11 हल्ल्यातील आरोपी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने रोखला
  2. PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका भेटीतून भारताला काय मिळाले? जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details