100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार; मात्र दुसऱ्या डोजचे आव्हान कायम
आज 100 कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. हे लक्ष साध्य करण्यासाठी भारताना सुमारे 9 महिन्यांचा कालावधी लागला आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारी रोजी सुरु झाला होता.
100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार
By
Published : Oct 21, 2021, 11:58 AM IST
हैदराबाद -भारताने आज 100 कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. हे लक्ष साध्य करण्यासाठी भारताना सुमारे 9 महिन्यांचा कालावधी लागला आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारी रोजी सुरु झाला होता. यावेळी केंद्र सरकारने ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेनेका आणि भारत बायोटेकच्या कोवासीनने विकसित केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लसीच्या कोवाशील्डच्या आणीबाणीच्या वापरास मान्यता दिली होती.
16 जानेवारीपासून सुरू झाली लसीकरण मोहीम -
देशात कोरोना लसीकरण मोहीम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय कोविड -19 लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा सुरू केला. ऑक्सफोर्ड, अॅस्ट्राझेनेका आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोवाशील्डच्या आपत्कालीन वापरास सरकारने मंजुरी दिली होती. 18 सप्टेंबर रोजी देशभरात लसीचे 25 दशलक्ष डोस देण्यात आले. लस देण्यासाठी देशभरात 52,088 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी 50,056 सरकारी केंद्रे आहेत, जिथे मोफत लस दिली जात आहे. तर 2,032 खाजगी आहेत.
टप्प्याटप्प्याने 100 कोटींच्या पार -
एक कोटी लसीकरणाचे ऐतिहासिक यश मिळवण्यासाठी भारताला 34 दिवस लागले. 20 फेब्रुवारी रोजी भारताने एक कोटी लसींचा आकडा गाठला होता. पहिल्या टप्प्यात फक्त ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय सेवा कर्मचारी आणि कोरोना योद्धा यांना ही लस दिली जात होती. 45 पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू झाले. 21 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण 1 मेपासून सुरू झाले. भारताला पहिल्या 100 दशलक्ष लसीकरणाच्या आकड्यांना स्पर्श करण्यासाठी 85 दिवस लागले, परंतु भारताने 650 दशलक्ष डोसपासून 750 दशलक्ष डोसपर्यंतचा प्रवास केवळ 13 दिवसात पूर्ण केला.
तारीख
वैक्सिनेशन का आंकड़ा
11 एप्रिल
10 कोटी
29 एप्रिल
15 कोटी
6 ऑगस्ट
50 कोटी
26 ऑगस्ट
60 कोटी
31 ऑगस्ट
65 कोटी
13 सप्टेंबर
75 कोटी
19 सप्टेंबर
80 कोटी
2 ऑक्टोबर
90 कोटी
10 ऑक्टोबर
95 कोटी
21 ऑक्टोबर
100 कोटी
परदेशात लसीकरणाची काय आहे स्थिती -
डब्ल्यूएचओच्यानुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये लसीचे 221 दशलक्ष डोस दिले गेले आहेत. तेथील 47.5 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोज देऊन पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या 57% लोकसंख्येला दोन्ही डोज मिळाले आहेत. संपूर्ण लसीकरणात संयुक्त अरब अमिरात पहिल्या क्रमांकावर आहे. जपानच्या 65.8% लोकांचे आणि ब्रिटनमधील 67.3% नागरिकांचे दोन डोज पूर्ण झाले आहेत.