नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत 200 कोटींहून अधिक लस डोस देण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. (covid vaccination government stock of 3 crore) भारताचा कोविड लसीकरणकार्यक्रम अद्याप संपलेला नाही, यातच सरकारकडे 3 कोटी लसीच्या डोसचा साठा पडून आहे अशी माहिती वृत्त संस्थेने (India covid vaccination) दिली आहे.
लसीकरण सुरुच : सरकारचा कोविड लसीकरण कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे. परंतु तो अद्याप संपलेला नाही. सुमारे 3 कोटी कोविड 19 डोस अजूनही सरकारकडे वेगवेगळ्या केंद्रांवर उपलब्ध आहेत. काही महिन्यांसाठी हा साठा पुरेसा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील निर्णय कोविडच्या प्रसारावर अवलंबून असेल. पुढील लसीकरण मोहिमेवर जोर देताना सूत्रांनी सांगितले की लसींची खरेदी सध्या आवश्यक नाही. परंतु याचा अर्थ असा नाही, की सरकारचा कोविड लसीकरण कार्यक्रम संपला (covid vaccination not over) आहे.
केंद्र सरकार वचनबद्ध :देशभरात कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्या सोबत तीची गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी लसीकरण 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले. लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा 21 जून 2021 रोजी सुरू झाला. लसीकरण मोहिमेला अधिक लसींची उपलब्धतेमुळे वेग आला असे सांगितले जाते.