नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही वाढत असल्याचे दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातच भारतात गेल्या 24 तासांत 46,148 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 979 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 58,578 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- एकूण रुग्ण : 3,02,79,331
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,93,09,607
- सक्रिय रुग्ण संख्या : 5,72,994
- एकूण मृत्यू : 3,96,730
- एकूण लसीकरण: 32,36,63,297
कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या सुमारे तीन लाखांच्या पुढे गेली आहे. तर देशातील रिकव्हरी रेट 96.80 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर हा 1.31 आणि सक्रिय रुग्णांचा दर 1.89 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 17,21,268 हजार जणांना लस टोचवण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 32,36,63,297जणांचे लसीकरण झाले आहे.