नवी दिल्ली :देशात गेल्या २४ तासांमध्ये १ लाख, २७ हजार ५१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या ५१ दिवसांमधील ही एका दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ८१ लाख, ७५ हजार ४४ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
गेल्या ४३ दिवसांमध्ये पहिल्यांदाच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० लाखांहून खाली आली आहे. सध्या देशात १८ लाख, ९५ हजार ५२० सक्रिय रुग्ण आहेत. सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही कमी होऊन ६.६२ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या सात दिवसांपासून हा दर १० टक्क्यांहून राहिला आहे. तर, सध्या साप्ताहिक पॉिझिटिव्हिटी दरही ८.६४ टक्क्यांवर आला आहे.