नवी दिल्ली - भारतात कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आलीय. तथापि, तज्ञांचा असा विश्वास आहे की या लसीचे फायदे जास्त आहेत आणि धोके कमी आहेत. कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय समितीने लसीकरणानंतरच्या अॅनाफिलेक्सिस (गंभीर अॅलर्जिक रिअॅक्शन) मुळे झालेल्या या पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
नॅशनल एईएफआय कमिटीच्या अहवालानुसार, 68 वर्षीय व्यक्तीने 8 मार्च, 2021 रोजी एका लस घेतली. त्यानंतर गंभीर अलर्जीमुळे त्याचा मृत्यू झाला. लसीकरणानंतर, लसीकरण केंद्रावर 30 मिनिटे प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू टाळता येऊ शकतो. या समितीने पाच प्रकरणे 5 फेब्रुवारीला, आठ प्रकरणे 9 मार्चला आणि 31 मार्चला आढळलेल्या 18 प्रकरणांचा अभ्यास केला.