महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महात्मा गांधींच्या पुतळ्याची अमेरिकेत विटंबना; भारताने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला - अमेरिकेत गांधीजींच्या मूर्तीची विटंबना

कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल पार्कमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली. यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

पराराष्ट्र मंत्रालय
पराराष्ट्र मंत्रालय

By

Published : Jan 30, 2021, 4:32 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल पार्कमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा शनिवारी भारताने तीव्र शब्दांत निषेध केला. महत्वाचे म्हणजे 2016 मध्ये मोदी सरकारने हा पुतळा भेट म्हणून दिला होता. 27-28 जानेवारीला ही घटना घडली असून परराष्ट्र मंत्रालयाने देखील आज यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

27 जानेवारीला पार्कचा कर्मचारी तेथून जात असताना पुतळा मोडल्याचे लक्षात आले. 6 फूट उंचीची आणि 300 किलो वजनाची ही प्रतिमा डेव्हीसच्या सेंट्रल पार्कमध्ये उभारण्यात आली होती. पुतळा का पाडण्यात आला हे अद्याप समजले नाही. तथापि, स्थानिक भारतीय समुदाय संघटनांनी तोडफोडीच्या कृत्याचा निषेध केला आहे.

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडे हे प्रकरण उचलून धरले आहे. डेव्हिसच्या महापौरांनी या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आहे आणि त्यांनी चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. 2020 च्या डिसेंबरमध्ये खलिस्तानी समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासासमोर असलेल्या गांधीजींच्या मूर्तीची विटंबना केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details