महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमावाद: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये बोफोर्स तोफा तैनात

गलवान येथील तणावाच्या स्थितीबाबत डी. एस. हुड्डा म्हणाले, की भारतीय सैनिकांनी आपल्या भूभागात घुसखोरी करणाऱ्या चीनच्या प्रयत्नांना पुरेपुर विरोध केला आहे. त्यामुळे 15 जूनमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा 20 सैनिकांना वीरमरण आले.

India China LAC
India China LAC

By

Published : Oct 20, 2021, 8:50 PM IST

नवी दिल्ली- भारत-चीनमध्ये पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग सेक्टर अंतर्ग बम-ला येथे भारताने बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत. हा परिसर प्रत्यक्ष ताबारेषेजवळ आहे. या परिसरानंतर भारत-चीनच्या सीमा एकत्रित येतात.

गतवर्षी पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रत्यक्ष ताबारेषेवरील तणावाबाबत बोलताना माजी जनरल डी. एस. हुड्डा यांनी चीनवर भारताने दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष ताबारेषेबाबत भारताने रणनीती बदलण्याची गरज आहे. आपली पांरपारिक विचारसरणी आणि रणनीती कामाला येणार नाही. कारगील समीक्षा समितीने सीमा सुरक्षेबाबत काही शिफारशी केल्या होत्या. त्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

तवांग सेक्टरमध्ये बोफोर्स तोफा तैनात

हेही वाचा-Lakhimpur Violence: लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, आज लागणार निकाल?

गलवान येथील तणावाच्या स्थितीबाबत डी. एस. हुड्डा म्हणाले, की भारतीय सैनिकांनी आपल्या भूभागात घुसखोरी करणाऱ्या चीनच्या प्रयत्नांना पुरेपुर विरोध केला आहे. त्यामुळे 15 जूनमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा 20 सैनिकांना वीरमरण आले.

हेही वाचा-राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतले केदारनाथांचे दर्शन.. एक लाखाहून अधिक भाविक केदारनाथमध्ये दाखल

स्थिती किती गंभीर आहे?

2013 मध्ये डेपसांग, 2014 मध्ये चुमार आणि 2017 मध्ये डोकलामध्ये चीनने घुसखोरी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, भारत-चीनने शांततेने मार्ग काढला होता. सध्याच्या स्थितीत चीनच्या हालचाली पूर्णपणे वेगळ्या आहेत.

भारत-चीनच्या प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक विविध भूभागात चीनच्या सैनिकांची मोठी संख्या आहे. चीनच्या सैनिकांकडून होणाऱ्या हिंसेमुळे सर्व प्रोटोकॉलच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. चीनद्वारा नेहमीच कुरापती होत असल्याने भारताला नियमांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे माजी जनरल डी. एस. हुड्डा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-लखनौवरून आग्राला जाणाऱ्या प्रियंका गांधींना पोलिसांनी महामार्गावरच रोखले!

चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देश समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत आणि चीनदरम्यान तब्बल चर्चेच्या 13 फेऱ्या पार पडल्या आहेत. भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणांवरून मतभेद आहेत. लडाखमध्येच नाही तर अरुणाचलमध्येदेखील चीनच्या कारवाया सुरूच आहेत.

उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत चीनने घेतला होता आक्षेप

भारताबरोबर सीमारेषेवरून वाद उकरून काढणाऱ्या चीनने नुकतेच आगळीक केली आहे. देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अरुणाचल प्रदेशला दौरा केल्यानंतर चीनने आक्षेप नोंदविला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी 9 ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशचा दौरा केला. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या विधीमंडळात सदस्यांना संबोधित केले. त्यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, की ईशान्य भारतामध्ये परिवर्तन दिसू लागले आहे. अनेक दशके विकासापासून दूर राहिला आहे. या प्रदेशाचा विकास होऊ लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details