महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम- राजनाथ सिंह - केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आपत्कालीन हवाई धावपट्टी आहे. हे देशाची एकता, अखंडत्व आणि सार्वभौमपणा यांचे संरक्षण करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे दाखविते.

राजनाथ सिंह
राजनाथ सिंह

By

Published : Sep 9, 2021, 3:25 PM IST

जयपूर (राजस्थान) - देश हा एकता, अखंडत्व आणि सार्वभौमपणा यांचे संरक्षण करण्यासाठी तयार आहे. कोणत्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी देश सक्षम असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते राजस्थानमधील जलोर येथील आपत्कालीन हवाई धावपट्टीचे उद्घाटन करताना बोलत होते.

केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, एअर चिफ मार्शल आर.के.

एस. बहादुरिया यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे सी-130 जे सुपर हर्क्युलस हे मालवाहू विमान हे आपत्कालीन हवाई धावपट्टीवर उतरले.

हेही वाचा-मानहानी प्रकरण : कंगनाला दिलासा नाही; जावेद अख्तर यांच्याविरोधातील याचिका फेटाळली

विविध 20 ठिकाणी आपत्कालीन धावपट्टी आणि हेलीपॅड सुरू होणार-

यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आपत्कालीन हवाई धावपट्टी आहे. हे देशाची एकता, अखंडत्व आणि सार्वभौमपणा यांचे संरक्षण करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे दाखविते. ही आपत्कालीन धावपट्टी आणि तीन हेलिपॅड हे केवळ युद्धात नाही तर बचाव मोहिम, आणि नैसर्गिंक संकटातही कामाला येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) हे विविध 20 ठिकाणी आपत्कालीन धावपट्टी आणि हेलीपॅड सुरू करण्यासाठी काम करत आहे.

हेही वाचा-मोदींनी घेतली भारताच्या स्टार पॅरालिम्पिक खेळाडूंची भेट

देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गाचा वापर आपत्कालीन हवाई धावपट्टीसाठी!

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की जेव्हा चाकोरीबाह्य कल्पना मांडली जाते, तेव्हा त्याचा स्वीकार केला जातो. 3 किमीची हवाई धावपट्टी बांधण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि हवाईदलाने मदत केल्याने आनंद आहे.

राजस्थानमधील बारमेर येथे असलेल्या सत्ता-गंधाव या 925A राष्ट्रीय महामार्गावरही आपत्कालीन हवाई धावपट्टीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग हे आपत्कालीन हवाई धावपट्टीसाठी वापरण्यात येणार आहेत.

हेही वाचा-आता 'हायवे'चं 'रनवे', हवाईदलाच्या लढाऊ विमानांचे NH-925 राष्ट्रीय महामार्गावर लँडींग

लखनऊ-आग्रा हायवेवर विमानांचे लँडींग -

ऑक्टोबर 2017 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी लखनऊ-आग्रा हायवेवर भारतीय एक-एक करुन लँडिंग केलं होतं. वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड करण्यात आलं होतं.

शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची -

युद्धस्थितीत रनवेचं नुकसान झाल्यास शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरते. 1965 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकून भारताच्या एअरबेसची नासधूस केली होती. त्यामुळे भारतीय वायुसेनेला ऑपरेशन करताना अडचणी आल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details