महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India Canada Row : कॅनडात हिंदू समुदायाला विरोधी पक्षनेत्यांचा पाठिंबा, द्वेषपूर्ण टीकेचा केला निषेध - निज्जरच्या हत्येमागं भारताचा हात

India Canada Row : कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी न घाबरता कॅनडात जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी कॅनडातील हिंदूना येणाऱ्या धमक्यांचा निषेध केलाय. कॅनडात हिंदूचं योगदान म्हत्वाचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.

India Canada Row
India Canada Row

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 6:04 PM IST

नवी दिल्ली India Canada Row :भारत-कॅनडा यांच्यातील संबंध ताणले जात असताना, कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी कॅनडातील हिंदूंना लक्ष्य केल्याबद्दल निषेध केला आहे. कॅनडाच्या विकासात हिंदूंनी अमूल्य योगदान दिलं आहे. त्यामुळं हिंदू समुदायाचं कॅनडात नेहमीच स्वागत केलं जाईल, असंही ते म्हणाले.

भारतीय वंशाच्या नागरिकांना धमकी : प्रत्येक नागरिक कॅनडात न घाबरता राहण्यास पात्र आहे. 2019 मध्ये भारतात बंदी घालण्यात आलेली खलिस्तान समर्थक संघटना शिख फॉर जस्टिस (SFJ) चे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नून यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांना कॅनडा सोडण्याची धमकी दिली होती. त्यांची ही धमकी व्हायरल झाल्यानंतर कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.

हिंदूचं कॅनडात महत्वपूर्ण योगदान :X (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे म्हणाले, "प्रत्येक कॅनेडियन नागरिकाला निर्भयपणे कॅनडात जगण्यास अधिकार आहे. अलीकडच्या काळात, आम्ही कॅनडातील हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या द्वेषपूर्ण टीका पाहिल्या आहेत. आम्ही या परंपरावादी द्वेशपूर्ण टीकेचा निषेध करतो. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात हिंदूंनी अमूल्य योगदान दिलं आहे. त्यामुळं हिंदूंच नेहमीच कॅनडात स्वागत केलं जाईल अशी प्रतिक्रिया पॉइलीव्हरे यांनी दिली आहे. कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हिंदूंसाठी कॅनडा घर आहे. कॅनडात येण्यास तुम्ही पात्र आहात." भारत-कॅनडा तणावग्रस्त संबंधांमध्ये दोन्ही नेत्यांचे ट्विट आले आहेत.

निज्जरच्या हत्येमागं भारताचा हात : शुक्रवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दावा केला की, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत अनेक दिवसापूर्वी भारत सरकराला माहिती दिलीय. या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रूडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागं भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. नज्जरची हत्या या वर्षी 18 जून रोजी कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारतानं ट्रुडो यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या या आरोपांना भारतानं राजकीयदृष्ट्या प्रेरित म्हटलंय. दोन्ही देशाच्या तणावानंतर भारतानं कॅनडातील नागरिक तसंच विद्यार्थ्यांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं होतं.

हेही वाचा -

  1. India Canada Relations : भारत-कॅनडा संघर्षाचा कृषी संसाधनांवर परिणाम? वाचा सविस्तर
  2. PM Trudeau Allegation On India : भारताबाबत काही आठवड्यांपूर्वीच केले होते आरोप, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंचा खुलासा
  3. Indian Government Advisory On Canada : कॅनडामधील भारतीय नागरिक, विद्यार्थ्यांना सरकारची ॲडव्हायजरी जारी

ABOUT THE AUTHOR

...view details